Thursday, February 5, 2009

बिपाशा आई कॅटरीना गई

अजय देवगणने आपल्या होम प्रॉडक्शन चित्रपटासाठी कॅटरीनाऐवजी बिपाशाला साईन केले आहे. आता बोल्ड आणि सेक्सी बिपाशा अजयची नायिका बनणार आहे.
अजय शिवाय संजय दत्त आणि फरदीन खानही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाचे नाव अजूनही निश्चित झालेले नाही. अजय बरोबर बिपाशाने 'अपहरण' हा चित्रपट केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि बिपाशाने 'जमीन'हा चित्रपट केला आहे. आता हे सर्वजण एकत्र येत असून मार्चमध्ये गोव्यात शूटींग सुरू होणार आहे.